शि.सा.का. संचालक व मा.पंचायत समिती सदस्य भरत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, वनावल ते रुदावली रस्त्याचे भूमिपूजन

बातमी कट्टा:- अनेक वर्षांपासून खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत होते.याबाबत शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी वनावल गटाचे लोकप्रतिनिधी भरत भिलाजी पाटील यांच्याकडे रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी मागणी केली होती.अखेर भरत पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर धुळे जिल्हा परिषदेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून आज भूमिपूजन करण्यात आले.

धुळे व नंदुरबार विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा,शिरपूर माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तसेच वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषाताई भरत पाटील यांच्या प्रयत्नातून वनावल ते रुदावली या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम धुळे जिल्हा परिषदेमधून 50- 54 या निधीतून मंजूर करण्यात आले .
            
गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले होते . शेतकरी तसेच ग्रामस्थांना दळणवळणासाठी  मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. तसेच खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी वनावल गटाचे लोकप्रतीनीधी भरत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. भरत पाटील यांनी सतत पाठपुरावा करत  जिल्हा परिषदेमधून हा रस्ता मंजूर करण्यात आला.
   
या कामाचे भूमिपूजन  शि.सा.का. संचालक व मा.पंचायत समिती सदस्य भरत भिलाजी पाटील,माजी.पंचायत समिती उपसभापती जगतसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुदावली गावाचे उपसरपंच पितांबर पाटील, रामसिंग राजपूत, बाळू पाटील ,अनिल देवरे,बाळू राऊळ, मधुकर नामदेव,साहेबराव रामसिंग, ईश्वर भिल, दिलीप भिल व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी गावातील नागरिकांनी आमदार अमरीशभाई पटेल व वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषाताई भरत पाटील यांचे आभार मानले.

WhatsApp
Follow by Email
error: