शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी 10 हजार रुपयांचे अनुदान वाटप

बातमी कट्टा:- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत निराधार निराश्रित व विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अनुदान योजना अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील रुपये एक लखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यां करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे या कार्यालयामार्फत राबविण्यात येते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून संबंधित लाभार्थ्यास 10 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.


जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते “विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहकरिता अनुदान” या योजनेअंतर्गत रुपये 10 हजार रुपयांचा धनादेश कविता सतिष पाटील व आशाबाई कन्हैयालाल पाटील(कापडणे), मिनाबाई रतिलाल पाटील(पिंपरखेड),वंदना प्रमोद बागल(निमगुळ),रेखाबाई भिला पाटील(ढंडाने),मिनाबाई ब्रिजलाल ईशी (झोटवाडे) यांना देण्यात आला सदर लाभ मिळवून देण्यासाठी कापडणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण बन्सीलाल पाटील यांनी विशेष प्रयत्न केलेले असून याव्यतिरिक्त मीना गोकुळ पाटील(धनुर) शैला हेमंत सातभाई (धुळे) या एकुण आठ महिलांना अनुदानाचा धनादेश आज रोजी देण्यात आले.याकामी महिला बालविकास अधिकारी सचिन शिंदे,एम एम बागुल,सविता परदेशी,चंद्रकिरण सिसोदे, वसंत पाटील,राकेश नेरकर, देवेंद्र पाटील विजय राजपूत योगेश धनगर आदी कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले

WhatsApp
Follow by Email
error: