शुभांगी पाटीलांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट

व्हिडीओ वृत्तांत

बातमी कट्टा:- नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक चांगलीच रंगणार असून निवडणुकीत सत्यजित तांबे विरुध्द शुभांगी पाटील अशी सरळ लढत रंगणार आहे. यासाठी जोतो आपल्या परिने कामाला लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे आहे. एकीकडे तांबे कुटूंबीय निवडणूकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असतांना दुसरीकडे शुभांगी पाटील या पक्षांचे समर्थन मिळवण्यासाठी संघर्ष करतांना दिसत आहे.आज सकाळी शुभांगी पाटील यांनी शेगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे.

व्हिडीओ

नाशिक विधान परिषदेच्या निवडणूकीत चांगली चुरसीची लढाई बघायला मिळणार आहे.आज सकाळी नाशिक विधान परिषदेच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी नाना पटोले यांची भेट घेतली आहे.शिवसेना पक्षाने शुभांगी पाटील यांना अधिकृत समर्थन मिळाल्यानंतर महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील समर्थन मिळावे यासाठी शुभांगी पाटील आज नाना पटोले यांची शेगाव येथे भेट घेतली आहे.

उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असून यात कुठल्या उमेदवाराला समर्थन द्यायचे याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना सांगितले आहे.या नाशिक विधान परिषदेच्या निवडणूकीत पुढच्या हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: