
बातमी कट्टा: शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांसह शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व संपूर्ण पटेल परिवाराचे मोठे योगदान असून सातत्याने विविध उपक्रम राबवून तालुक्यातील जनतेला सुखी संपन्न ठेवण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी केले.

तालुक्यातील भोरटेक गावाजवळ मानमोडे नाल्यावर शिरपूर पॅटर्न स्वरुपाचा तसेच धुळे जिल्हा परिषद लघु सिंचन डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत 352 व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन 21 ऑक्टोबर 2023 सकाळी 10 वाजता आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. येत्या काही दिवसात लगेचच दुसऱ्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरु होईल.
यावेळी कार्यक्रमाला आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती नरेंद्रसिंह जमादार, शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक तुकाराम दोरिक, शिरपूर पंचायत समिती उपसभापती विजय बागुल, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी प्रेमचंद शिरसाठ, अशोक पाटील, वासुदेव पाटले, सर्जेराव पाटील, प्रकाश चौधरी, एकनाथ जमादार, अविनाश पाटील, विजयसिंग गुजर, योगेश बोरसे, सुरेश पाटील, जे. टी. पाटील, संदीप पाटील, दगड़ू जाधव, ज्ञानेश्वर गोड, मच्छिन्द्र जाधव, प्रदिप जाधव, भुलेश्वर गुजर, श्याम पाटील, आर. एस. शिरसाठ, जयवंत पाटील, रोशन सोनवणे, हिमतराव गुजर, रमेश मराठे, बाळू पाटील, भूषण जाधव, रघुनाथ गोड, उज्ज्वल निकम, हुकुम पाटील, शिरपूर पिपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, राजेंद्र चौधरी, महेश चौधरी, वामन कोळी, राकेश पाटील तसेच भोरटेक, थाळनेर, मांजरोद, भाटपुरा, घोडसगाव व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ, शिरपूर पॅटर्न टीमचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. काशिराम पावरा म्हणाले, शिरपूर तालुक्याचा शेतकरी सुखी व्हावा, तालुक्यातील भूजल पातळी वाढावी यासाठी आमदार अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली 351 शिरपूर पॅटर्न बंधारे तयार आहेत. शेकडो बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. भाई शिरपूर तालुक्यासाठी युगपुरुष आहेत. शेतकरी सुखी व्हावा यासाठी भाई व आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकरी बांधवांचे तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलीनी दर्जेदार उच्च शिक्षण घ्यावे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भाईंनी सोय केली आहे. शिरपूर आमदार कार्यालय मार्फत शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम व्यापक स्वरुपात सुरु आहे. संपूर्ण पटेल परिवार सेवाभावी वृत्तीने काम करत असून ईश्वरीय कार्य करत आहेत.
प्रास्ताविकात शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक तुकाराम दोरिक यांनी सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत भाईंनी 351 बंधारे पूर्ण केले असून हजारो कोटी लिटर पाणी थांबवले आहे. तालुक्यात आतापर्यंत 157 कि.मी. नाला खोलीकरण झाले असून 1500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. अनेक ठिकाणी एस्केप गेट बसवून प्रकल्प यशस्वी केले. धरमखोयी नाल्यात तापी नदी बॅक वॉटर मुळे 2 कि.मी. क्षेत्र लाभ झाला आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम पाटील यांनी केले.