शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्याने
भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश…

बातमी कट्टा:- सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न विधानभवनात मांडले. त्यामुळे कुंडाणे (वेल्हाणे) येथील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.


धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे, बाबरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेत प्रकल्प बाधित होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची अनेक मालमत्ता भूसंपादन प्रक्रियेत सुटलेली आहे तसेच जेवढे भूसंपादन झाले आहे, त्या शेतकऱ्यांनाही अत्यल्प मोबदला जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रकल्पबाधित सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन सुटलेल्या मालमत्तांचेही मूल्यमापन करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांची होती. या मागणीला आमदार कुणाल पाटील यांनी विधानभवनात वाचा फोडून योग्य तो मोबदला देण्याची मागणी केली. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांना वाचा फोडणारे आमदार म्हणून आम्हाला आ.कुणाल पाटील यांचेसारखे नेतृत्व मिळाल्याच्या भावना भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. आणि त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निमगुळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत कुंडाणे (वेल्हाणे) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यात मच्छिंद्र चैत्राम पाटील,प्रल्‍हाद रघुनाथ पाटील, संतोष भिका पाटील, राकेश पाटील, बाळू धनगर, बापू मराठे, भिका पाटील, विजय पाटील, उखा पवार, इन्‍दल पवार, साईदास पवार आणि सजन पवार यांच्यासह असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाला शिरुड सरपंच गुलाबराव कोतेकर,खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे,पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, कृऊबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, ज्येष्ठ नेते ॲड.बी.डी.पाटील, माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, निमगुळ सरपंच पांडूरंग मोरे, अ‍ॅड.बी.डी.पाटील,माजी जि.प.सदस्य विशाल सैंदाणे, रावसाहेब पाटील,निमगुळ माजी सरपंच नवनीत मोरे, माजी पं.स.सदस्य छोटू चौधरी, सायने सरपंच योगेश पाटील, खरेदी विक्रीच व्हा.चेअरमन दिनकर पाटील,संतोष राजपुत, राजीव पाटील, बापू खैरनार,रविंद्र राजपूत,संतोष राजपूत,अनिल पाटील,कैलास जाधव,बळीराम राठोड,आबा शिंदे,चुडामण मराठे, उत्तम राजपूत आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: