बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात शेतकर्यांचे सर्वच सहकारी प्रकल्प बंद करून निवडणुका लागल्यावर प्रशासनाला हाताशी धरून परस्पर हुकूमशाही ने बिनविरोध निवडनुका करण्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठीचा केविलवाणा प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काहीही झाले तरी निवडणूक न लढवता बिनविरोध निवड कशी होईल म्हणजे मते मागण्यासाठी लोकांकडे जाण्याचा प्रश्नच नको, लोकांना निवणुकित मतदानाची संधी मिळायला नको हाच प्रकार प्रत्येक शेतकरी सहकारी संस्थांच्या बाबतीत होत आहे. जस की सूतगिरणीची निवडणूक, कारखान्याची निवडणूक, बागायतदार संघ, दूध संघ या निवडणुका कशा होतात हे आता लोकच विसरून गेलेली आहेत की काय असा प्रश्न पडतो. कारण निवडणुकाच होत नसतील तर कस समजेल.
शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटेल कशी? आणि वाचा फोडेल कोण?शेतकर्यांच्या नावावर केलेला भ्रष्टाचार किती दिवस असच उघड्या डोळ्यांनी पाहत बसणारं ?
हेच पुन्हा पुन्हा व्हायला नको म्हणून शेतकरी फाउंडेशनचे मोहन पाटील, ॲड गोपाल राजपूत यांच्यासह उभ्या असलेल्या शेतकरी बचाव पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या.
शेतकरी बाजार समितीमधे होणारा अन्याय
आपला शेतमाल विकायला बाजारात शेतकरी जातो पण तिथं जाऊन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतो. त्यांच्या जागा इतरांनी बळकावल्या , मालाला हमी भावाने खरेदी केली जात नाही, सौदे मनमानी पद्धतीने होतात, संचालकांना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अण्ण्यायावर बोलायला वेळ नाही, भ्रष्टाचार सुरूच आहे , जसं की कट्टी लावणे…, बाजार समितीत बांधाकामात भ्रष्टाचार, मनमानी खर्च करणे जस की मागच्या वेळी 80 लाखांचा अवास्तव खर्च उघडकीस आम्ही आणला होता. हे असे अनेक प्रश्नांना वाचा फोडायची संधी म्हणजे ही बाजार समितीची निवडणूक. या निवडणुकीत सत्ताधारीनी काही उमेदवार आपल्याच लोकांनी विरोध केल्यावरही निव्वळ लादलेले उमेदवार आहेत . म्हणजे नको असलेले , भ्रष्टाचाराने हात भरलेले उमेदवार शेतकऱ्यासाठी कसे काय पुढे येईल? म्हणून सुज्ञ, जाणकार मतदारांनी अन्यायला वाचा फोडणारे शेतकऱ्यांसाठी मदतीला धाऊन जाणारे संचालक निवडून द्यावेत जेणेकरून भ्रष्टाचार देखील होणार नाही आणि शेतकरी देखील बाजार समिती मध्ये नाडला जाणार नाही.
साखर कारखाना
शेतकरी बंधुंनो मला आपणास सांगायला आनंद वाटेल की आम्ही शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष डॉ जितेंद्र ठाकूर, शेतकरी फाउंडेशनचे ॲड गोपाल राजपूत, मोहन नाना पाटील, व सहकारी यांनी कारखाना सुरू व्हावा म्हणून वेळोवेळी पाठपुरावा, जागृत सभा, आंदोलने,बैलगाडी मोर्चा करून अधिकारी,सहकार मंत्री यांच्याशी मीटिंग करून शेवटी मुदत संपलेल्या संचालकांना कारखाना भाडे तत्वावर देण्यास भाग पाडले आणि म्हणून आज कारखाना भाडे तत्वावर सुरू करण्याच्या हालचाली सुरु होऊन शेतकऱ्यांना लवकरच कारखाना सुरू झालेला दिसेल. हे सांगण्या मागचा उद्देश एवढाच की, शेतकर्यांसाठी मी डॉ जितेंद्र ठाकूर, शेतकरी फाऊंडेशन चे ॲड गोपाल राजपूत, मोहन पाटील आणि सोबतचे सहकारी यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीला न जुमानता लढा दिलेला आहे . म्हणजे आम्ही हा संघर्ष केला नसता तर कारखाना कधीच भंगारात विकला गेला असता. हे सत्य सर्व सुज्ञ शेतकरी यांना माहितीच आहे. म्हणून कारखाना सुरु करण्याचे श्रेय आपल्या सर्व स्वाभिमानी शेतकर्यांचेच आहे.
सूतगिरणी
शेतकऱ्यांची सूतगिरणी हजारो कोटीचे कर्ज घेऊन देखील बंदच आहे. व आता स्वतःच्या कंपनीला भाडे तत्वावर दिली आहे. त्याचीही निवडणूक बिनविरोध करून मतदारांना मतदान पासून वंचित ठेवण्यात आले. मतदारांना जाब विचारण्याची संधी होती ती देखील मिळायला नको. म्हणून हुकूमशाही पद्धतीने मनमानी भ्रष्टाचार सुरूच आहे. आणि बळी ठरतोय तो फक्त शेतकरी. या सूतगिरणीत अनेकांच्या ठेवी अडकल्या होत्या. सोबत आलेल्या सर्वांच्या कधी भेटू शकत नसलेल्या ठेवी परत मिळवून दिल्या त्याही….. व्याजासकट.म्हणजे आम्ही शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव पुढे असतो.
सर्वच पक्षातील पदाधिकारी यांना करतो की जे लोक शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लादलेल्या उमेदवरांपेक्षा सदैव तत्पर राहिले आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आहे, भ्रष्टाचार उघडकीस आणला असेल अशा शेतकरी बचाव पॅनलच्या उमेदवारांना येत्या 30 तारखेला शिट्टी चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी बाजार समितीत निवडून पाठवावे असे आवाहन डॉ जितेंद्र ठाकूर
अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती शिरपूर यांनी केले आहे.