बातमी कट्टा:- शेतकरी शेतात काम करत असतांना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करत तीन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना घडली असून या हल्ल्यानंतर मात्र त्याच शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 18 रोजी सकाळी शिंदखेडा तालुक्यातील हतनूर येथे आज सकाळी शेतात काम करणार्या शेतकर्यांवर (farmers) बिबट्याने अचानक वृध्द शेतकर्यावर हल्ला केला. त्यानंतर जवळील विलास पाटील आणि अमृत पाटील या दोघांनावरही बिबट्याने हल्ला चढविला. तिघांनी मोठ्या जिवाच्या आकांताने आरडा-ओरड सुरू करीत बिबट्याला प्रतिकारही करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात तिघेही जखमी झाले.त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या दरम्यान शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर त्याच शेतात बिबट्याही मृतावस्थेत आढळून आला आहे.बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.घटनास्थळी धुळे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, शिंदखेड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल पवार,वनपाल नितीन सांगळे, प्रविण वाघ, नितीन मंडलीक आदींनी घटनास्थळी दाखल झाले होते.बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.