
बातमी कट्टा:- तापी नदीच्या बॅक वॉटर मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आज आमदारांची भेट घेऊन नुकसानाबाबत माहिती दिली.याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोरच आमदार काशिराम पावरा यांनी तात्काळ शिरपूर तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारींना मोबाईल द्वारे संपर्क साधून पंचनामा करण्याबाबत सुचना केली.
काल दि 17 रोजी हातनुर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला होता.यामुळे तापी नदीत पुर आल्याने तापीचे बॅक वॉटर ईतरत्र सोडण्यात आले.या बॅक वॉटर मुळे तापी आणि अरुणावती नदी काठावरील शेतांमध्ये पाणी शिरले.पाणीचा प्रवाह जास्त असल्याने आज संपूर्ण पिकानचे नुकसान झाले.वेचणीला आलेला कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जमीनदोस्त झाला.याबाबत शिरपूर तालुक्यातील पिंपरी येथील शेतकऱ्यांनी आज प्रांताधिकारी आणि आमदार काशिराम पावरा यांची भेट घेतली आणि काल तापीच्या बॅक वॉटरमुळे शेतात झालेल्या नुकसानीच पाढा वाचला.यानंतर आमदार काशिराम पावरा यांनी तात्काळ तहसीलदार महेंद्र माळी आणि तालुका कृषी अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या समस्या सांगून तात्काळ पंचनामा करण्याबाबत सुचना दिल्या.आमदार पावरा यांनी शेतकऱ्यांसमोर तात्काळ संपर्क साधल्याने शासनाकडून पंचनामे जलद गतीने होतील यामुळे शेतकरींनी काही अंशी समाधान व्यक्त केले.
