बातमी कट्टा:- सततच्या नापिकी व अतिवृष्टीमुळे शेतीत होणाऱ्या नुकसानीला कंटाळून 49 वर्षीय शेतकऱ्याने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जिवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दि 30 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील खर्दे बु. येथील तरुण शेतकरी निंबा भिला गुजर वय 49 यांचा आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास राहत्या घराशेजारी असणाऱ्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.मयत निंबा गुजर यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत शवविच्छेदन करण्यात आले.नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार शेतात होणाऱ्या नापिकी व अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकरी निंबा गुजर हे चिंतेत होते.शेतात ऊस लागवड केली होती मात्र ऊस तोडणी होत नसल्याने चिंतेत होते.आज सकाळी त्यांनी घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्यात दोरच्या साह्याने गळफास घेऊन जिवनप्रवास संपवल्याचे सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.
