शेतकऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…

बातमी कट्टा:- नापिकी आणि कर्जपणाला कंटाळून शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 17 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.याबाबत शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 17 रोजी सकाळच्या। सुमारास दोंडाईचा जवळील रामी जवळ असलेल्या रेल्वे रूळावर एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळी नागरिक दाखल झाले होते.यावेळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.सदर आत्महत्या करणारे व्यक्तीचा शोध घेतला असता शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रेमसिंग रतनसिंग राजपूत(सोलंकी) वय 57 यांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याचे समजले.

शेतकरी प्रेमसिंग राजपूत(सोलंकी) यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता. काही वर्षापासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने व त्यातच त्यांनी शेतीवर कर्ज घेतले होते.वेळेत कर्जाची परतफेड होत नसल्याने ते काही दिवसांपासून चिंतेत होते.आणि आज सकाळी दोंडाईचा येथे येऊन रामी जवळील रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव येथील नातेवाईकांनी दोंडाईचा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: