बातमी कट्टा:- शेतात असलेल्या ट्रान्सटफार्मर मुळे भरदुपारी उन्हात लागलेल्या आगीत सुमारे 12 ते 15 एकर पेक्षा जास्तीचा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात चार ते पाच शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 18 रोजी दुपारच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील बाभुळदे शिवारात तोडणीला आलेल्या ऊसाच्या क्षेत्रात आग लागली.शेतात विजेचा ट्रान्सटफार्मर असून त्यात झालेल्या शॉर्टशर्कीट मुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण करत जवळपास चार ते पाच शेतकऱ्यांच्या 12 ते 15 एकर ऊस जळून खाक झाला.काल भर उन्हात बाभुळदे शिवारातील दिगांबर बारकु पाटील,भास्कर मोतीराम पाटील,रामेश्वर नथु पाटील,प्रकाश वेळु पाटील यांच्या सह शेतकऱ्यांच्या 12 ते 15 एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
