बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील बोरीस येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी विजय देवराम बेहेरे यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रात सुमारे एक हजार सीताफळ झाडांची लागवड करुन आर्थिक प्रगती साधली आहे.विशेष म्हणजे ते घेत असलेले उत्पादन हे २० टक्के रासायनिक आणि ८० टक्के सेंद्रिय पध्दतीने असल्याने त्यांची सीताफळे परराज्यात जातात अशी माहिती त्यांनी दिली आहे.यातून त्यांंना एकरी सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळत असून एका हंगामात 3 लाखांचा खर्च वजा करता 8 ते 9 लाखांचा निव्वळ नफा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विजय देवराम बेहेरे वय 40 यांनी एम ए चे शिक्षण पुर्ण केले मात्र त्यांना लहनापनापासूनच शेतीची आवड आहे त्यांची धुळे तालुक्यातील बोरीस येथे वडीलोपार्जित 7 एकर शेती आहे.विजय बेहेरे यांचे वडिल देवराम बेहेरे यांनी 1990 पयावाणा पपई लागवड केली ते वाशी मार्केट येथे जात होते तेव्हा सोलापूर येथून मार्केट येथे उमराण जातीचे बोर विक्री येत होते.ते बघून देवराम बहिरे यांनी 1991-92 साली शेतात बोर फळपिकांचे लागवड केली.त्यानंतर बोर विक्री करतांना वाशी व गुजरात मार्केट येथे सिताफळ विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले.वडील देवराम बहेरे यांच्या सोबत शेतीत फळपीक लागवडीचा विचार केला आणि 4 एकर क्षेत्रात सिताफळाची लागवड केली.त्यासोबत बोरांचे देखील लागवड केली आहे.
2017-18 साली सीताफळांची लागवड केल्यानंतर लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांना उत्पादनाला सुरुवात झाली.सीताफळांची काढणी करतांना एक विशीष्ट पध्दत अवलंबली जाते.मजूरांना माहिती देऊन मगच सीताफळ तोडण्यात येतात.आतापर्यंत चार हंगाम त्यांनी घेतली आहे.एका हंगामात 6 टन उत्पादन झाले.
हंगामात दररोज एक टन सीताफळांची काढणी होते. या हंगामात 3 लाखांचा खर्च वजा करता 8 ते 9 लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे विजय बेहरे त्यांनी सांगितले.त्यांच्या बांधावर परराज्यातील व्यापारी प्रत्यक्ष येऊन ५५ ते ६० रुपये प्रतीकीलो दर भावाने सिताफळ खरेदी करत आहेत. सिताफळाचे तोडणी संपल्यानंतर बोरींचे उत्पन्न सुरु होते.त्यांच्या या कामात लहान भाऊ प्राध्यापक दिपक बेहरे,वडीलांसह संपूर्ण कुटुंब मेहनत घेत असल्याचे विजय बेहेरे यांनी सांगितले.