शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला “रोटाव्हेटर”

बातमी कट्टा:- शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पिक लागवडी नंतर कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेतकऱ्यावर संकट ओढवतांना दिसत आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या पाऊसामुळे तोंडा समोरील घास हिरवण्याची चिंता व्यक्त होत आहे.लामकानी येथील एका शेतकऱ्याने आपल्या उभ्या कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवल्याचे समोर आले आहे.

पिक लागवडी दरम्यान पाऊस नव्हता दुष्काळ जन्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी जेमतेम पिक उभे केले मात्र जेव्हा गरज नाही तेव्हा सततच्या धुवारी व पाऊसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.धुळे जिल्ह्यातील लामकानी परिसरात देखील अशीच परिस्थिती ओढावली आहे.सततच्या धुवारी व पाऊसामुळे येथील पिकांचे नुकसान होत आहे.यात कांदा पिक पुर्णता खराब होत आहेत. वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकांचे नुकसान होत आहे.काही दिवसांपूर्वी शेतातील पिके व्यवस्थित दिसत होते यामुळे शेतकरींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.मात्र पाऊसामुळे व रोज होणाऱ्या वातावरणातील बदल मुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ते पिक खराब होतांना दिसत आहे.

लामकानी येथील शेतकरी युसूफ खाटीक यांनी आपल्या चार बिघे क्षेत्रात कांदा लागवड केली होती.यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना खर्च लागला लावणी, फवारणी किंवा निंदणी असेल यात हजारो रुपयांचा त्यांनी खर्च केला होता.काही दिवसांपूर्वी पिक समाधानकारक दिसत असल्याने महिन्याभरात या कांदा पिकातून मोठे उत्पादनाची आशा खाटीक यांना होती.मात्र आता अचानक सुरु झालेल्या सततच्या पाऊसामुळे व वातावरणातील बदल मुळे कांदा पिक खराब होतांना दिसू लागले.यामुळे शेतकरी युसूफ खाटीक यांनी त्यांनी चार बिगे क्षेत्रातील पिकावर ट्रँक्टरने रोटा फिरवला.

सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाने सरसकट पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: