शेताच्या झोपडीतून पोलिसांनी केला गांजा जप्त…

बातमी कट्टा हाडाखेड शिवारातील आसरापाणीपाडा गावाजवळ एका शेताच्या झोपडीत प्लॅस्टिकच्या गोणीत लपवलेला मानवी मेंदूवर परिणाम करणारा अदृश्‍य आमली पदार्थ सुका गांजा आढळून आल्याने शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत त्यात 71 हजार रुपयांच्या 7 किलो 200 ग्रॅम वजनाच्या सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.त्यात एका संशयितांला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुका पोलिसांना हाडाखेड शिवारातील आसरापाणीपाडा गावाजवळ एका झोपडीत मानवी मेंदूवर परिणाम करणारा अदृश्य अमली पदार्थ सुका गांजा लपवण्याची व त्याची चोरटी विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्याआधारे सांगवी पोलिसांनी एक पथक तयार करून दिनांक 14 रोजी दुपारी 2;30 वाजेच्या सुमारास हाडाखेड शिवारातील आसरापाणीपाडा गावालगत शेतातील झोपडीत राहात असलेला संशयित सुभाष अमरसिंग पावरा याने झोपडीच्या मध्यभागी एका प्लॅस्टिकच्या गोणीत अदृश्य अमली पदार्थ सुका गाजा चोरटी विक्री करण्याचा उद्देशाने व आर्थिक फायद्यासाठी आढळून आला त्याला जप्त करण्यात आला आहे त्याचे मोजमाप केले असता प्लॅस्टिकच्या गोणीत 7 किलो 200 ग्रॅम वजनाच्या अदृश्य अमली पदार्थ सुका गांजा मिळून आला. त्याच्या बाजारभाव प्रमाणे 71 हजार रुपयांच्या सुका गांजा जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपी सुभाष अमरसिंग पावरा राहणार हाडाखेड शिवारातील आसरापाणीपाडा त्याला ताब्यात घेऊन पोकाँ योगेश बाळकृष्ण मोरे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा सुका गांजा दृश्‍य पदार्थ आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एन डी पी एस अँक्ट सन 1985 चे कायदा कलम 20 व 22 प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार उपनिरीक्षक दीपक वारे असई लक्ष्मण गवळी असई वानखेडे पोहेकाँ हेमंत पाटील पोना कुंदन पवार योगेश दाभाडे योगेश मोरे गोविंद कोळी पोहेकाँ शेख वनक्षेत्रपाल राजपत्रित अधिकारी मंगेश वाघ मोटर वाहन निरीक्षक यांनी केली आहे

WhatsApp
Follow by Email
error: