शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी कट्टा:- 29 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार 16 फेब्रुवारी 2022 सायंकाळी उघडकीस आली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही.

शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात नामदेव पाटील नामदेव पाटील यांची शेती आहे.त्यांचा मुलगा अजय नामदेव पाटील वय 29 हा शेतात गेलेला होता दरम्यान अजय पाटील याने स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने अजय पाटील यांनी बुधवारी 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गळफास घेतलेला स्थितीत आढळून आला.घटनेची माहिती प्राप्त होताच थाळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.मयत अजय पाटील याला नातेवाईकांनी खाली उतरवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी पुढील कारवाई उशिरापर्यंत थाळनेर पोलिसांकडून सुरू होती.

WhatsApp
Follow by Email
error: