बातमी कट्टा:- विवाहित महिला व तरुणाचा शेतात मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.आज दि 21 रोजी दोघांचेही मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळुन आले आहेत. सदर घटना हत्या की आत्महत्या ? हे अद्याप समजू शकलेले नाही.
धुळे तालुक्यातील बोरीस येथील विवाहित महिला व विवाहित तरुणाचा दि 21 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याला मृतदेह आढळून आला.दि 17 रोजी शुक्रवारी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार सोनगीर पोलीस स्टेशनात देण्यात आली होती.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दाखल झाले होते.दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.ही घटना हत्या की आत्महत्या ? हे अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतर येणाऱ्या अहवालात याचे नेमके कारण समजू शकेल.याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे तपास करीत आहेत.