बातमी कट्टा:- शेतात काम करणाऱ्या २९ मजूरांना विषबाधा झाल्याची घटना काल दि २१ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.घटनेनंतर रुग्ण मजूरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/UDGLQ8du3NM?si=k4dnICS16wat5B01
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील पाटण महादेव भागातील व इतर शेतमजुर आपल्या मुला बाळासह चिरणे कदाणे शिवारात शेतमजुरीसाठी गेले होते.दुपारच्या सुमारास काम आटोपून मजूरांनी पाणी पिऊन ट्रॅक्टर मध्ये बसून जात असतांना अचानक उलट्या तसेच अन्य त्रास होवु लागला. सर्वांना तात्काळ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/UDGLQ8du3NM?si=k4dnICS16wat5B01
यावेळी तालुका वैदयकीय अधिकारी डॉ़ भुषण काटे डॉ विनय पवार, स्वाती राजपुत यासह सर्व परिचारिका व कर्मचारी यांनी उपचार सुरु केले जवळ पुरुष महिला व लहान मुलांमध्ये 29 शेतमजुरांचा समावेश आहे. उपचारानंतर सर्व रुग्ण मजूरांची प्रकृती स्थिर आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/UDGLQ8du3NM?si=k4dnICS16wat5B01