बातमी कट्टा:- शेतात मजूराला बिबट्या दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजूरांनी हातातील काम सोडून शेतातून पळ काढला.यामुळे परिसरात घबराटीचे शातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठस्से दिसून आले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 3 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील उंटावद शिवारात शेतात कामासाठी जाणाऱ्या मजुराला बिबट्या दिसला.बिबट्या असल्याचे समजताच शेतात काम करणारे मजूर हातातले काम सोडून सैरावैरा पाळायला लागले,याची खबर वनविभाग शिरपूरला मिळाल्यानंतर वनपाल पी एच माळी यांच्यासह राउंड स्टाप, व नेचर कँझर्वेशन फोरमचे योगेश वारुळे हे घटनास्थळी दाखल होऊन पगमार्कचा शोध घेत होते,मजुरांना दिसणारा वन्यप्राणी नेमका बिबट्याच आहे की अन्य दुसरा कोणी प्राणी हे पडताळात असतांना बिबट्याचे पायाचे ठस्से यावेळी दिसून आले आहेत. त्यावरून सदरचा पगमार्क(पायाचे ठसे) हे बिबट या वन्यप्राण्यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन पुढील कार्यवाही वनपाल पी एच माळी व राउंड स्टाप करीत आहे.
नागरिकांमध्ये वन्यप्राण्याची दहशत निर्माण झाली आहे. जेमतेम पाऊस थांबून 1 दिवस झाला शेतकऱ्यांच्या शेतीकामाची लगबग सुरू झाली आणि त्यातच बिबट्याचे शेतात दर्शन होणे हे अधिक संकट शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.