बातमी कट्टा:- शेतात विषारी औषध प्राशन करुन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दि 1 रोजी घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून शेतात होणाऱ्या नुकसानीमुळे व कर्जपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शहादा तालुक्यातील बोराळे येथिल शांतिलाल देवराम माळी वय ४६ हे दि ३१ रोजी सायंकाळी सात वाजता शौचालयास जातो असे सांगून गेले होते. मात्र ते रात्री घरी आलेच नाही. त्यांचे भाऊ व नातेवाईांकडून त्यांचा शोधा शोध सुरु असता ते मिळून आले नाहीत दि १ नोहेंबर रोजी सकाळी ९ वाजता बोराळे गावालगत राजेंद्र लोटण पाटील यांच्या शेतात ककुठल्यातरी विषारी औषध प्राशन करून मयत झाल्याचे मिळून आले. घटनेची माहिती मयत शांतिलाल यांचे भाऊ नानाभाऊ देवराम माळी यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे दिली.घटनास्थळी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पथक झाले होते.
मयत शांतीलाल माळी यांना दोन मुले, पत्नी, आई असा परिवार आहे.त्यांच्यावर बँकेत पीक कर्ज असून त्यासाठी ते बँकेच्या हेल्फाटे मारत होते. तसेच शेतात पपई पीक होती. विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केला होता म्हणून पपई पीक डोळ्या समोर कोरडे होत होते. विज वितरण कंपनीचे कर्मचारी १० हजार रुपये तात्काळ भरा असा आग्रह करीत होते ते भरण्यास पैसे नव्हते अश्या अनेक संकटांना कसे सामोरे जावे असा प्रश्न माळी यांना सतावत असल्या कारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याचे माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.