
बातमी कट्टा:- 20 वर्षीय तरुणाचा घरातील भांडे ठेवण्याचा रॅक सरकवत असतांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दोंडाईचा येथील गोविंद नगर येथे राहणारा रुपेश मनोज बोरसे वय 20 वर्षे हा शुक्रवारी दुपारी रात्रीच्या पाऊसात घरातील भांडे ठेवण्याच्या रॅकवर पाणी पडले असल्याने त्या रॅकला सरकवत असतांना त्यावेळी त्या रॅक मध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने रुपेशला शॉक लागला त्यात रुपेशचा जागीच मृत्यू झाला.त्यास दोंडाईचा रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जून नरोटे यांनी मृत घोषित केले.रूपेश त्याच्या वडीलांचा भाजीपाला व्यवसायाला सांभाळत होता.त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण मोठा भाऊ, वहिनी असा परिवार होत. दोंडाईचा पोलीस स्टेशनात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.