!!श्री कार्तिकस्वामी दर्शन!!
दिनांक १८ आणि १९ नोव्हेंबर २०२१ (गुरुवार आणि शुक्रवार)

योगेश्वर मोरे,बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील कुरखळीत दि १८ नोव्हेंबर वार गुरुवार रोजी कार्तिक स्वामींची यात्रा कार्तिक शु. १४ दि.१८ नोव्हेंबर, त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दुपारी १२ वाजेच्या मुहूर्तावर भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन भाविकभक्तांसाठी खुले होणार आहे. तर दि. १९ नोव्हेंबर ला दुपारी २.२८ मि वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. 

तापीकाठावर वसलेल्या कुरखळी गावातील प्राचीन कुरकुटेश्वर महादेव मंदिरात भगवान कार्तिक स्वामी यांचे मूर्ती स्थापित असून वर्षातून एकदाच मंदिराचे द्वार दर्शनासाठी खुले होत असते. या दिवशी दर्शन घेण्यासाठी शुभ मुहूर्त मनाला जात असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. कार्तिक  स्वामींच्या दर्शनाला येणारे भाविक मूर्तीस मोरपीस, श्रीफळ, प्रसाद अर्पण करीत असतात. 


 कुरखळी -कुरकुटेश्वर महादेव मंदिर हे मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले सावळदे व कुरखळी फाट्या पासून 2 कि. मी. अंतरावर आहे .भाविक भक्तांनी दर्शनासाठी येण्याचे आवाहन कुरखळी ग्रामस्थ व जय सियाराम परिवाराने केले आहे. भाविकांनी दर्शनासाठी येतांना तोंडाला मास्कचा वापर करायचा आहे. तसेच सामाजिक अंतर राहील या मापदंडानुसार दर्शनाचा लाभ घ्यावे असे आयोजकांकडून आवाहन केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: