बातमी कट्टा:- कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने प्रथम खाजगी रुग्णालय म्हणून उत्तर महाराष्ट्रात यशस्वीरित्या कोरोना बाधित रुग्णाचा उपचार केला व मोठ्या प्रमाणात रुग्ण देखील बरे केलेत.तदनंतर कोरोनाची दुसऱ्यालाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तूटवडा झाला त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णालयाचे व प्रशासनाचे खूप हाल झाले.
असे असून देखील रुग्णालयाने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण बरे केलेत. या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून हॉस्पिटलच्या संचालक मंडळाने स्वबळाच्या आधारे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे जेणेकरून भविष्यात कोरोना सारख्या महामारीच्या वेळेस भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये या सर्व गोष्टींचे विचारकरून दि-15 रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व धुळे जिल्ह्याचे कलेक्टर जलज शर्मा , धुळे महानगर पालीकाचे आयुक्त अजीज शेख आणि जिल्हा परिषद सी.ई.ओ.वामनथी सी, पोलीस अधीक्षक चिन्मयजी पंडित,धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रभारी मा.बबनजी थोरात व आमदार मंजुळाताई गावित ,गोडमिसे मॅडम ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भादंगे व इतर सर्व राजकीय व सामाजिक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थीत होते व संचालक मंडळ डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ नैनेश देसले, डॉ.संजय संघवी, डॉ. विलास रेलन, डॉ.हरीश मेहरा व संपूर्ण हॉस्पिटल कर्मचारी वृंद उपस्थीत होते.