बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील उमर्दा या गावात संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे जगन शेवाळे उपस्थित होते त्यांच्यासह ते सरपंचांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन वाटप करण्यात आले.

यावेळी मुलांना थोडक्यात अनमोल मार्गदर्शन करण्यात आले.संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.तसेच संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनच्या माध्यमतून जेवणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.यावेळी संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल पावरा यांनी संस्थेबद्दल थोडक्यात माहिती दिली. व शिवाजी मांजऱ्या वसावे सरपंच,रविंद्र वसावे सामाजिक कार्यकर्ते, खंडू गुलवणे ग्रामपंचायत सदस्य, कांतिलाल शिंदे सामाजिक कार्यकर्ते, श्रीमती. टीमकाबाई पावरा, श्रीमती. रमकाबाई गुलवणे तसेच गावकरी मंडळी इ.उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारीपा गावीत यांनी केले तर गेजा पावरा यांनी आभार व्यक्त केले.