बातमी कट्टा,नेर दिलीप साळुंखे :- धुळे तालुक्यातील नेर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नेर आठवडे बाजार असतांना शेतकरी बाजारात गेले होते याची संधी साधुन विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतातील ट्रान्स्फॉर्मर पुर्व सुचना न देता अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
धुळे तालुक्यातील नेर,देऊर,भदाणे,नांद्रे,खंडलाय,शिरधाने हे बागायती गावे असुन कांदा,कापूस,मका,भाजीपाला व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे.दोन दिवसापुर्वी गारपीठ झाली यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच लागवड,बियाणे,खते व मजुरीत मोठा पैसा खर्च झाला असून शेतकऱ्यांची पिके गहु,कांदा,मका काढणीला आला आहे. सध्या शेतकर्यांकडे पैसा शिल्लक नाही अशा परिस्थितीत निसर्गाचा प्रकोप ह्यामुळे बळीराजाची मनस्थिती खालावली आहे.गेल्या दिड महिन्यापूर्वी सक्तीची वसुली केल्याने शेतकऱ्यांनी विज भरणा केला मात्र तरी देखील शेतकऱ्यांचे पिके काढणीवर आले असताना व दुषित पाणी पडुन आता पिकांना चांगले पाणी देण्याची गरज असतांना ही अडवणूक केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट ओसरली व असंख्य शेतकऱ्यांसह नेर गावाचे माजी सरपंच व गट नेते शंकरराव खलाणे,ग्रामपंचायत सदस्य डाॅ सतिष बोढरे,माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव बोरसे, कांग्रेसचे योगेश गवळे,भदाणे येथील प्रभाकर माळी,सुरज मारनर,त्र्यंबक पाटील,रावसाहेब पाटील,भुषण खलाणे, विलास माळी,दिनेश मारनर,विश्वास पाटील,रघुनाथ मारनर, देऊरचे चुडामण महाले,आबा शेवाळे,अर्जुन शेवाळे,कैलास पाटील आदींनी विज मंडळाचे फेज एकचे कनिष्ठ अभियंता बी व्ही सुर्यवंशी,फेज दोनचे बी एम शेंडगे यांना घेराव घातला त्याच बरोबर विज सबस्टेशनच्या आवारात ठिया आंदोलन केले तसेच धुळे ग्रामीणचे उपअभियंता वाय बी चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी विज जोडणी सुरु होणार नाही असे सांगीतले शेवटी शेतकऱ्यांनी घेराव घालून एक तास ठिया आंदोलन केले.
यावेळी शंकरराव खलाणे यांनी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व त्यांनी त्वरीत मंडळाचे कार्यकारी अभियंता डी डी भामरे यांच्याशी संपर्क करून त्वरीत विज जोडणीचे आदेश दिलेत त्यामुळे विज जोडणी झाली व पुन्हा विज पुरवठा खंडित केला तर पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून महामार्गावर रास्ता रोखो करू अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.