बातमी कट्टा:- चार वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना दि 11 रोजी दुपारी घडली असून संशयिताला पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
पिडीत बालिकेच्या वडीलांनी फिर्याद दाखल केली असून दि 11 रोजी दुपारच्या सुमारास खंडू इंदल मोरे रा.सार्वे याने त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला नदी पलीकडे असलेल्या झाडाझुडुपांमध्ये नेऊन तेथे अत्याचार केला.या फिर्यादीवरून नरडाणा पोलीसांनी संशयित खंडू मोरे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.