
बातमी कट्टा:- दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना अखेरचा श्वास घेतला.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथील संदीप नारायणसिंग गिरासे हे आपल्या कुंटूबासोबत पुणे येथे राहत होते.पुणे येथील एका कंपनीत ते कामाला होते.दि १३ रोजी सायंकाळच्या सुमारास पुण्यात रांजणगाव कडून शिरूर कडे मित्रासोबत मोटरसायकलीने जात असतांनाच समोर चालणाऱ्या एम एच ४३ सीई १६६२ या मालवाहू वाहनाला मोटरसायकलीने धडक दिली. अपघाताच्या घटनेनंतर उपस्थितांनी संदीप गिरासे व त्यांचा मित्र दोघांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.दोन दिवसांपासून संदीप गिरासे यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र आज सकाळच्या सुमारास संदीप गिरासे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. रुग्णालयात उपचारादरम्यान संदीप गिरासे यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी,आई ,वडील भाऊ बहीण असा परिवार होत.संदीप राजपूत यांच्या निधनाची माहिती मिळताच चिलाणे गावावर शोककळा पसरली.
