
बातमी कट्टा:- चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार करत पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जंगलात फरार झालेल्या संशयित पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर येथील कालुसींग खाऱ्या भिल हा पत्नी नर्मदाबाई कालुसींग वय 55 यांच्या चारीत्र्यावर संशय घेत होता.कालुसींग याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने व मुसळीने पत्नी नर्मदाबाई यांच्यावर वार केला व तेथून कालुसींग फरार झाला.घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर नर्मदाबाई यांना रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी उपचारादरम्यान नर्मदाबाई यांचा मृत्यू झाला. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलीसांना दिल्याने सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.यावेळी खून करुन जंगलात फरार झालेल्या कालुसींग भिल याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.मुलगा मंगलसिंग यांनी वडील कालुसींग विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
