संशयाने केला घात ! पतीने केला पत्नीचा खून,व्हिडीओ व सविस्तर…

बघा व्हिडीओ

https://youtube.com/@batmikatta बातमीकट्टा चे चैनल सबस्क्राईब करा

बातमी कट्टा:- चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना काल दि २८ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून संशयित पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

On youtube

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील यशवंत नगरात नागेश दगडू कानडे वय ३५ व दिपाली नागे कानडे वय २८ यांनी आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह करुन ते एकत्र कुटूंबात राहत होते.पत्नी दिपालीवर पती नागेश हा चारित्र्याचा संशय घेत होता.दोन दिवसांपासून त्यांचात वाद सुरू होता.

बघा व्हिडीओ

काल दि २८ रोजी शनिवारी दुपारी ३ ते ३:३० दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला.यावेळी नागेश याने पत्नी दिपाली हिला मारहाण करत धारदार शस्त्राने तिच्या डोक्यात वार करुन गंभीररित्या जखमी केले.जखमी अवस्थेत दिपाली हिला गंभीर अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धुळे शहर पोलीसांनी धाव घेत चौकशी केली.पोलीसांनी संशयित नागेश कानडे याला ताब्यात घेतले आहे.

बघा व्हिडीओ

https://youtube.com/@batmikatta व्हिडीओ वृत्तांत आमच्या युट्यूब चैनलला सबस्क्राईब करा

WhatsApp
Follow by Email
error: