सख्खा भाऊ पक्का वैरी, बहिणीचा खून करून मृतदेह गोणपाटात बांधून ठेवला होता घरात….

बातमी कट्टा:- घरातून अचानक बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह गोणपाटात दोरीने बांधून नाल्यात फेकलेला आढळून आला होता.हा खून कोणी व का केला ? याबाबत पोलीसांकडून शोध सुरु होता.अखेर महिलेच्या भावानेच दागिने आणि शेतीसाठी महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे.महिलेचा खून करुन मृतदेह गोणपाटात टाकून तो घरी घेऊन गेला व तेथे मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर मृतदेह असलेला गोणपाट गाशाजवळील नाल्यात फेकून दिल्याची कबुली संशयाताने दिली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साकुबाई सुपड्या वळवी वय 65 यांच्या पतीचे निधन झाले होते तर मुल बाळ नसल्याने सकुबाई या एकट्याच राहत शेतमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते.साकुबाई यांचा भाऊ पोसल्या नोगर्या वळवी रा.निजामपूर ता.नवापूर हा देखील गावातच राहत होता मात्र भाऊ पोसल्या हा साकुबाई यांचा सांभाळ करत नव्हता.दि 23 फेब्रुवारी 2022 रोजी पासून साकुबाई या अचानक बेपत्ता झाल्या होत्या.

याबाबत भाऊ पोसल्या वळवी याने विसरवडी पोलीस स्टेशनात बहिण साकुबाई बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.त्यांचा सर्वत्र शोध सुरु असतांना दि 18 मे रोजी निजामपूर गावाचे शिवारात कोरड्या नाल्यात सुती गोणपाटाला दोरी बांधलेले असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती विसरवाडी पोलीसांना नागरिकांनी दिली.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता सदरचा मृतदेह साकुबाई यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी साकुबाई हिचा भाऊ पोसल्या वळवीसह ईतर नातेवाईक दाखल झाले होते.तर पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्यासह पोलीस प्रशासन दाखल झाले होते.इतक्या निदर्यपणे सकुबाई यांना कोणी व का मारले ? याबाबत पोलीसांनी चौकशी सुरु केली होती.घटनास्थळी कुठलाही पुरावा पोलीसांना मिळुन आला नव्हता.

पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांना गोपणीय माहिती मिळाली होती की सकुबाई हिचा भाऊ पोसल्या नोगर्या वळवी हा दोन ते तीन महिन्यापूर्वी चांदिचे दागिने विकण्यासाठी नंदुरबार गेला होता.पोलीसांनी खात्रीशीर माहिती घेत भाऊ पोसल्या वळवी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.पोसल्या वळवी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलीस प्रशासनाने विश्वासात घेऊन विचारपूस केले असता पोसल्या वळवी याने धक्कादायक कबुली दिली.

संशयित पोसल्या वळवी याने सांगितले की,सकुबाई पोसल्याची मोठी बहिण होती.तिला पती व मुल बाळ वगैरे नव्हते.तर पोसल्याची पत्नी सतत आजारी असल्यामुळे तगच्या औषधोपचारासाठी त्याला पैशांची गरज होती.पोसल्या व मयत साकुबाई यांच्यात जमीनीच्या हिस्सा वाटणीवरुन अनेकदा वाद झाले होते.दोन तीन महिन्यांपूर्वी पोसल्या याने साकुबाई हिला घरातच जिवेठार करुनगोणपाटात टाकले व ते गोणपाट त्याने त्याच्या घरी आणून ठेवले होते.तर अंगावरील सोने नंदुरबार येथील सोनारास विकले होते.काही दिवसानंतर मृतदेहाचा वास येत असल्याने पोसल्या याने ते मृतदेहाचा गोणपाट गावाजवळील कोरड्या नाल्यात टाकून दिल्याची माहिती पोसल्या वळवी याने पोलीसांना दिली.

WhatsApp
Follow by Email
error: