बातमी कट्टा:- सख्या मामेभाऊचा जंगलात खून केल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.कोणसही संशय येणार नाही अशा पध्दतीने तो वावरत होता. एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असल्याने कायद्याचे ज्ञान असल्याने पळवाटांचा पुरेपूर वापर करत होता.मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने तिक्ष्ण हत्यार व दगडाचा वापर करुन खून केला व ओळख पटणार अशा ठिकाणी सोडून पळून गेल्याची कबूली स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे.
दि 16 डिसेंबर रोजी सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे निकुंभे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. सदर मृतदेहाचे पोलिसांनी सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करुन मृतदेहाची ओळख पटवली.सदर मृतदेह मुगाव नगाव येथील गोरक्षनाथ विठ्ठल पाटील वय 40 रा साई कॉलनी अरुणनगर देवपूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते.त्या अनुषंगाने खूनाचा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाकडून शोध सुरु होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मयत गोरक्षनाथ पाटील यांच्या खूना मागे त्यांचा आतेभाऊ गजानन सजन देवरे वय 42 वर्ष व्यवसाय दुध वाटप रा.भोकर ता.धुळे यांच्यावर संशय होता.मात्र गजानन देवरे हा एल.एल.बी च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असल्याने त्याचा कायद्याचा अभ्यास असल्याने पळावाटांचा पुरेपूर वापर करीत होता.मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने बारकाईने चौकशी करुन तपास केला.चौकशीअंती कौशल्यपुर्वक संशयिताच्या वर्तणाचा व देत असलेल्या उत्तरांचे विश्लेषण करुन कसुन चौकशी केली तेव्हा गजानन देवरे याने खूनाच्या गुन्ह्याची कबूली दिली.
गजानन देवरे व मयत गोरक्षनाथ पाटील हे एकमेकांचे सख्खे आतेभाऊ मामेभाऊ असुन दोघांमध्ये नेहमी आर्थिक व्यवहार होत होते.परंतु संशयित गजानन देवरे याची त्याचा मामेभाऊ गोरक्षनाथ याच्याकडे दुधाची व वेळोवेळी दिलेल्या ऊसनवार पैशांची उधारी वाढत गेली.सदर उधारी जवळपास 4 लाखांपर्यंत गेल्याने संशयित गजानन देवरे हा वेळोवेळी मयताकडे ऊसनवार पैशांची मागणी करत होता.दि 15 रोजी व्यवहारावरुन दोघांमध्ये वाद झाल्याने संशयित गजानन देवरे याने तिक्ष्ण हत्यार व दगाडाचा वापर करुन मयत गोरक्षनाथ पाटील यास ओळख पटणार नाही अशा अवस्थेत सोडून घरी पळून आला होता.नंतर मयत गोरक्षनाथच्या अंत्यविधीच्या सर्व कार्यक्रमात हजर राहुन कोणासही संशय येणार नाही असा पध्दतीने संशयित गजानन देवरे वावरत होता.परंतु धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने खूनाचा उलगडा करत संशयित गजानन पाटील याला ताब्यात घेतले.कसून चौकशी केली असता गजानन पाटीलने खूनाची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात शिवाजी बुधवंत,सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राऊत ,संजय पाटील, संतोष हिरे,कुणाल पानपाटील,उमेश पवार,रविकिरण राठोड,विशाल पाटील,योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी,राहुल गिरी,योगेश जगताप,किशोर पाटील, सुनिल पाटील,मनोज महाजन, विलास पाटील,गुलाब पाटील आदींनी केली आहे.