सचिन राजपूत यांच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध

बातमी कट्टा:- सावळदे येथील गट नेते तथा उपसरपंच सचिन राजपूत यांच्या पुढाकाराने शिरपुर तालुक्यातील सावळदे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध पार पडली.यात संपूर्ण 13 जागा बिनविरोध जाहीर झाले आहेत.
 
माजी मंत्री अमरिशभाई पटेल,आमदार काशीराम पावरा, जि प अध्यक्ष तुषार रंधे, उपनगराध्यक्ष भपेशभाई पटेल, युवा नेते चिंतन भाई पटेल,राहुल रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदे येथील गट नेते तथा उपसरपंच सचिन पदमसिंग राजपूत यांच्या पुढाकाराने सरपंच अनिल दोरीक व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकित ग्रामविकास पॅनलची बिनविरोध निवड झाली.

सचिन राजपूत यांनी चुरशीची असलेली सावळदे ग्रामपंचायतीत कोणताही राजकीय वारसा नसतांना अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी 9 पैकी 9 उमेदवार निवडून आणले होते.गावाने अनुभवलेल्या त्यांच्या विकास कामांच्या यशोगाथेमुळे त्यांना विकास सोसायटीच्या निवडणुकीत फायदा झाला. यामुळे संपूर्ण 13 सदस्य बिनविरोध निवडून आले.

यात ग्रामविकास पॅनलकडून राजेंद्र छगणसिंग राजपूत, विठोबा सीताराम महाजन, भटेसिंग दादूसिंग राजपूत, तुकाराम रामकृष्ण महाजन, विलास निमदेव महाजन, ठाणसिंग महारु महाजन, सतीश रजेसिंग राजपूत, हुकूमचंद पोपट राजपूत, चुनीलाल उखा जगदेव, स्वप्नील वेडूसिंग जाधव, धुडकू भटा जगदेव, निलाबाई दयाराम भिल, रत्नाबाई भटेसिंग राजपूत, रेखाबाई अरुण पाटील हे सदस्य बिनविरोध निवडून आले.

निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी जेष्ठ नागरिक विजयसिंग फकिरा राजपूत,गोकुळसिंग नथुसिंग राजपूत, दयाराम झामऱ्या भिल, बन्सीलाल चिंधु कोळी, भास्कर लोटन महाजन, सरपंच अनिल दोरीक, उपसरपंच तथा सरपंच महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन राजपूत, तंटामुक्त अध्यक्ष अतुल राजपूत, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष विठोबा महाजन, सामाजिक कार्यकर्ता नामदेव वामन पवार (मिस्तरी) सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ सावळदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सावळदे विकास सोसायटीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने सर्व सदस्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: