सत्तेची नशा,बघा यांची भाषा..! नगसेवकाच्या महिला तलाठ्यावरील मुजोरीचा संतापजनक व्हिडीओ…

व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा व चैनल सबस्कराईब करा

बातमी कट्टा:- वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठींच्या पथकातील महिला तलाठीला नगरसेवकाकडून धक्का देत मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप तलाठींकडून करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नंदुरबार येथील जगताप वाडी येथे वाळु घेऊन जाणाऱ्या डंप्परला महसूल विभागाच्या पथकाने थांबवून चौकशी केली होती.यादरम्यान दोन तास तलाठींनी या वाळुने वाहतूक करणाऱ्या डंपरला अडवून ठेवले होते.मात्र चालकाने पथकातून सुटका करत डंपरला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी डंपरला अडवले.

या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी नगरसेवक गौरव चौधरी दाखल झाले.यावेळी नगरसेवक गौरव चौधरी आणि उपस्थित पथकातील महिला तलाठी यांचा वाद झाला. यावेळी नगरसेवक चौधरी यांनी महिला तलाठी निशा पावरा यांना धक्का देत मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप करत संतप्त तलाठींसह महसूल पथक नंदुरबार पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तर याबाबत नगरसेवक गौरव चौधरी यांच्या चालकाने देखील वाहन थांबवून पैसे मांगण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: