बातमी कट्टा:- चोरी,घरफोडी ,दरोडा टाकणे अंमली पदार्थाची विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीला एक वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.या हद्दपार झालेल्या टोळीचा म्होरक्या बनावट नोटा प्रकरणातील मास्टरमाईंट आहे.
जिल्ह्याभरात विविध गुन्हे दाखल असलेल्या टोळीला एक वर्षासाठी हद्दचोरी,घरफोडी करणे,दरोडा टाकणे अंमली पदार्थाची विक्री अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढू शकते.नेहमी एकत्रितरित्या तसेच वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने टोळी तयार करुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात.टोळीतील पाचही जणांवर धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकत्रित व स्वतंत्रपणे दखलपात्र गुन्हे दाखल असुन पुराव्याअंती मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहेत व नमूद गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे टोळीप्रमुख मुकेश ऊर्फ पप्पू प्रल्हाद कोळी वय 27 ,दिनेश वसंत जगदेव वर 31 ,गोरख मखन कोळी वय 33,तीघे रा.सावळदे ता.शिरपूर जुबेर इब्राहीम खाटीक वय 32 वर्ष तिरुपती नगर शिंगावे ता.शिरपूर व ईश्वर शिवलाल भोई वय 27 रा.वहाळ ता.चाळीसगाव जि.धुळे या पाचही जणांना एक वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यातील टोळीप्रमुख मुकेश ऊर्फ पप्पू कोळी हा बनावट नोटा प्रकरणी कोठडीत आहे.


