
बातमी कट्टा:- काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पावडी नवीन चेहरा असला तरी तो चेहरा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडतांना दिसत आहे. नंदुरबार लोकसभेच्या निवडणूकीत मतांमध्ये शिरपूर तालुका किंगमेकर ठरत असतांना या तालुक्यातील निम्मेपेक्षा जास्त लोकांनी अद्याप उमेदवाराला बघितलेले नाही.यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यात कमी पडतो की काय असे काहीसे चित्र बघायला मिळत आहे.
नंदुरबार लोकसभेच्या निवडणूकीत शिरपूर तालुक्यातील मतदांची बेरीज ही विजयाचा गुलाल उढळण्यासाठी मदत कत असते.यामुळे नंदुरबार लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुका कोणाला मतांचा लिड देईल याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले असते.भाजपचे खासदार डॉ हिना गावीत किंवा त्यांचे वडील मंत्री विजयकुमार गावीत यांच्यापैकी एकतरी रोजच शिरपूर तालुक्यात दौरा करतांना दिसत असतांना मात्र काँग्रेस पक्षाने आदीवासी भागात फेरफटका मारल्यानंतर अद्याप शिरपूर तालुक्यात आलेले नाहीत.
मुळात लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुका राजकीय उलथापालथ करण्यासाठी महत्वाचा ठरत असतांना काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी मात्र शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यात का अपयशी ठरत आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने मेळावा घेतल्यानंतर शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी फेरफटका मारला मात्र शिरपूर तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी अद्याप काँग्रेस उमेदवार पोहचलेले नाही.सर्व सामान्य जनतेमध्ये नवीन चेहरा असतांना गोवाल पाडवी बाबत अनेकांना अद्याप माहिती नसतांना सर्वसामान्य जनतेपर्यंत काँग्रेस पक्ष उमेदवार पोहचवू शकत नसणार तर मग काँग्रेस पक्ष लोकांकडे मत कुठल्या आशा ठेऊन मागण्यासाठी जातील आणि जनता का म्हणून नवीन चेहऱ्याला मतदान करेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.