सशस्त्र दरोडा,दरोडा टाकला मध्यप्रदेशात आणि रिकामी तिजोरी सापडली महाराष्ट्रात

व्हिडीओ

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यात जिनींग कंपनीत शस्त्र दरोडा टाकत तिजोरीसह कार घेऊन फरार झालेल्या संशयितांनी तिजोरीतील १३ लाखांची रोकड काढून रिकामी तिजोरी आणि कार मध्यप्रदेश हद्दीत सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे.चोरीची घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली असून त्या आधारावर शोध घेत असतांना पोलीसांना तिन क्विंटल वजनाची रिकामी तिजोरी व कार मिळून आली आहे.

On YouTube

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार महारष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या खेतीया येथील पानसेमल रोडवर संचेती कॉटेक्स जीनिंग आणि प्रेसींग प्रकिया कंपनी असून येथील कार्यालयावर सोमवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकला होता. सुरक्षा रक्षकास हत्यारचे धाक दाखवून गप्प करत कार्यालयाच्या आत शिरून सुमारे तीन क्विंटल वजनाची अवजड लोखंडी तिजोरीला गाढीवर ठेवत ओट्यावर ओढत आणून जवळच असलेल्या एमपी 09 सीव्ही 9957 क्रमांकाच्या इनोवा कारमध्ये मागच्या बाजूच्या डिक्कित चढवून तेथून पसार झाले.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संचेती कॉटेक्सचे मालक दिलीपकुमार बाबुदान संचेती यांनी ताबडतोप घटनेचे माहिती संबंधित खेतिया पोलिस स्टेशनला दिली. कार्यालयातील सी.सी.टी.व्ही ची पाहणी केली असता त्यात चोरांची सर्व कारनामे रेकॉर्ड झाले असून त्यात पाच चोरटे दिसून आले व गाडी कोणत्या दिशेने गेली ते पाहून पोलीस पथकाने शोधकार्य सुरु केले.यावेळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असलेल्या खेतीया पासून तीन की.मी.अंतर असलेल्या श्रीखेड ता. शहादा येथील शेतात चोरून नेलेली रिकामी तिजोरी व ईनोव्हा कार मिळून आली पोलीसांनी हस्तगत केली.

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते व फॉरेन्सिक टीमने तिजोरी वरील व गाडीवरील ठसे घेतले घटनास्थळी विभागीय पो.अधिकारी रोहित अलावा पोलीस निरीक्षक सी. एस.बघेल,पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार म्हसावद पो. स्टे यांनी घटनास्थळी भेट दिली.

WhatsApp
Follow by Email
error: