
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आज पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
आज दि 18 रोजी साक्री नगरपंचायतच्या पोटनिवडणूकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान 2 गटात वाद झाले.प्रभाग क्र 14 येथे भाजपा पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस असलेले शैलेश आजगे यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.मतदारांना मतदानासाठी आणल्याचा राग येऊन भाजपा पक्षाचे शैलेश अजगे यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांसमोर मारहाण केल्याचा आरोप यावेळी आजगे यांनी केला असून साक्री पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.या घटनेमुळे साक्री शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तर मतदारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण झाले.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.