साखरपुड्याच्या मंडपातच बांधली लग्नाची गाठ…! इंजिनिअर वधु व वर यांचा आदर्श विवाह…

बातमी कट्टा:- साखरपुडाच्या मंडपातच इंजिनिअर वधु-वराने विवाह केला असून त्यांच्या साध्यापध्दीने केलेल्या या आदर्श विवाहासाठी वधु व वराकडील परिवाराने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील रमाबाई कन्या विद्यालयाचे शिक्षक संतोष न्हासदे यांची मुलगी इंजिनिअर धनश्री (स्वाती) हिचा साखरपुडा शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील नूतन विद्यालयाचे पर्यावेक्षक प्रकाश माळके यांचा मुलगा इंजिनिअर यश(प्रतीक) याच्यासोबत ठरविण्यात आला होता.7 जुन रोजी शिरपूर शहरातील सदाशिव नगर येथील संतोष न्हासदे येथे साखरपुड्यासाठी वरपक्ष कडील परिवार आले होते.सकाळी साखरपुडा झाल्यानंतर उपस्थित असलेल्या अनेकांकडून येथेच विवाह करावा असा आग्रह करण्यात आला.यावेळी वधु पक्षाकडील न्हासदे व वर पक्षाकडील माळके परिवार यांनी विचारविनिमय करून लग्नासाठी होकार दिला.त्यानंतर त्याच ठिकाणी 12 वाजता हळद लावण्यात आली तर दुपारी 1 वाजता धनश्री व यश यांचा विवाह सोहळा पार पडला.

दोघेही उच्चशिक्षित वधु वरांनी काळाची गरज लक्षात घेऊन साखरपुड्याच्या मंडपात विवाह केला.न्हासदे परिवार आणि माळके परिवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: