बातमी कट्टा:- घरकुलसाठी लाभार्थ्याला धनादेश दकाढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 7500 रुपयांची लाच स्विकारतांंना कंत्राटी अभियंताला लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो.साक्री येथील पंचायत समिती घरकुल गृहनिर्माणचा कंत्राटी अभियंता वैभव हिंमत हालोरे वय 25 याने तक्रारदाराकडे घरकुलातील धनादेश काढून देण्यासाठी साडेसात हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत विभागाला तक्रार दाखल केली होती.लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने आज दि 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास साक्री येथील पंचायत समितीत सापळा लावला.यावेळी पंचायत समितीच्या आवरात कंत्राटी अभियंता वैभव हालोरे याला साडे सात हजार रुपयांची लाच स्विकारतांंना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर,पलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,मंजितसिंग चव्हाण,राजण कदम, भुषण खलाणेकर,प्रशांत बागुल,भुषण शेटे,सुधीर मोरे, संतोष पावरा,शरद काटके,कैलास जोहरे,संदिप कदम, रामदास बारेला,गायत्री पाटील,रोहीणी पवार,वनश्री बोरसे,जगदीश बडगुजर यांनी कारवाई आहे.