बातमी कट्टा:- शेतीच्या सातबारा उतारावर नाव बदलून मिळावे यासाठी 800 रुपयांची लाच स्विकारतांना तलाठीला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना आज दि 23 रोजी घडली आहे. तलाठी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तक्रादार यांचे शेतीचा साताबारा उतारावर नाव बदलून मिळावे या करिता तक्रादार यांनी त्यांचे पिंपळे(होळनांथे) गावाचे तालाठी कार्यालयातील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे वय 45 पिंपळे(होळनांथे) यांच्याकडे अर्ज करुन यांची भेट घेतली असता तलाठी बोरसे यांनी सातबारा उतारावर नाव बदलून देण्याकरिता तक्रादार त्यांच्याकडे 800 रुपयाची लाचेची मागणी केली असते बाबत त्यांनी धुळे लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.
तक्रारीवरुन आज दि 23 रोजी पडताळणी केली असता त्यांनी सातबारा उतारावर नाव बदलून देण्याकरीता 800 रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर लाचेची रक्कम लागलीच आणुन देण्याबाबत सांगिल्याने त्याचेवर यशसवी सापळा लावुन तलाठी ज्ञानेश्वर बोरसे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,मंजितसिंग चव्हाण, भुषण खलाणेकर,भुषण शेटे,प्रशांत बागुल,राजन कदम,कैलास जोहरे,शरद काटके,संदिप कदम,संतोष पावरा,रामदास बारेला,प्रविण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार,वनश्री बोरसे,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी कारवाई केली आहे.