बातमी कट्टा:- तिक्ष्ण हत्याराने पोटात भोसकल्याने गंभीर अंवस्थेत तो रक्तबंबाळ परिस्थितीत पळत असतांना भद्रा चौकात येऊन कोसळला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना घटनास्थळावरून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनास्थळी पोलीसांसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले.पोलीसांनी घटनेत वापरण्यात आलेला चाकू जप्त केला तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले.या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर शोध पथकाने धुळे येथून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले.भरवस्तीत घडलेल्या या फिल्मीस्टाईल घटनेनंतर संपूर्ण शिरपूर शहर हादरले.याप्रकरणी सात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात आहेत.
शिरपूरात सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या सुमारास शहरातील क्रांतीनगर जवळील नाल्या जवळ राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाला.यात राहूलच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. घटनास्थळावरून रक्तबंबाळ परिस्थितीत राहुल पळाला आणि क्रांतीनगरच्या भद्रा चौकात जाऊन कोसळला.घटनास्थळी राहुल भोई हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.यावेळी नाल्या पासून तर भद्रा चौका पर्यंत रक्तातील पायाचे ठसे उमटले होते.
राहूलला वडील राजू भोई यांनी गंभीर अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांची मोठ्याप्रमाणात गर्दी होती.यावेळी डॉक्टरांनी राहुल भोई याला मृत घोषित केले.
याबाबत फिर्यादी राजु भोई यांनी फिर्याद दिली असून गणेश ऊर्फ भट्या सुभाष जगताप पाटील रा.बालाजी नगर शिंगावे,दादा पाटील,बंटी पाटील,विकी दत्तू पाटील,मोहित धाकड,दिपक धोबी,कोहिनूर राजपूत आदींनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर,उप निरीक्षक किरण बार्हे, उपनिरीक्षक संदिप मुरकुटे आणि उपनिरीक्षक कुटे व दाखल होऊन चौकशी करण्यात आली.
शोध पथक संशयिताच्या शोधात निघाले तर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी रक्त पडलेल्या ठिकाणी व रक्ताच्या पायांच्या ठस्यांजवळ बॅरेर्गेटींग करण्यात आली होती.घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाल्यानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आले.तेथे पडलेले चपला व चाकू पोलीसांनी जप्त केले.यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने या घटनेतील संशयिताला धुळे येथून ताब्यात घेतले आहे.
बघा व्हिडीओ https://youtu.be/Wn4OMoeHFeM
याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.यावेळी पोलीस स्टेशनात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.जुन्या वादातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.