
फेसबुक वरील व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/1p8tV1KhYuB9BoqQ/?mibextid=qi2Omg
बातमी कट्टा:- साधूचा वेश परिधान करुन चारचाकी वाहनात आलेल्या भामट्यांनी सोन्याचे आंगठ्या व चेन लुटल्याची घटना घडली आहे.दि 25 रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर येथील निमझरी नाका परिसरात व धुळे तालुक्यातील लामकानी गावाजवळ जवळ घडली आहे.याप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु आहे.
फेसबुक व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/1p8tV1KhYuB9BoqQ/?mibextid=qi2Omg
शिरपूर शहर पोलिस स्टेशनात दिलेल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार शिरपूर शहरातील निमझरीरोड परिसरात दुपारी चार ते सव्वाचार वाजेच्या सुमारास रोहिदास वामन पाटील वय ८२ हे घरासमोरील निमझरी रोडच्या डिव्हायडरवर बसले होते.त्यावेळी त्यांच्याजवळ एका वाहनातून दोघे जण आले. यातील एक साधुच्या वेशात आला होता.
Facebook video https://www.facebook.com/share/v/1p8tV1KhYuB9BoqQ/?mibextid=qi2Omg
साधुने बोलण्याने संमोहित करून त्यांच्याकडील १ लाख २१ हजार ८०० रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १ लाख ८२ हजार ७०० रूपये किंमतीची सोन्याची चेन असा सुमारे ३ लाख ४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडे देण्यास भाग पाडले.त्यानंतर दोघे भामट्यांनी चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पोबारा केला.
त्याच दिवशी दि २५ रोजी सायंकाळी लामकानी गावातील व्ही.शी चौधरी(पाटील) हे निजामपूर रस्त्यावर वॉकींग करत असतांना चारचाकी वाहनातून साधु वेशात दोन जणांनी धुळे जाण्याचा रस्ता विचारला रस्त्याची दिशा दाखविल्यानंतर आपण चांगले व्यक्ती आहात असे म्हटल्याने व्ही.शी.चौधरी यांनी वाकून नमस्कार केला असता गळ्यातील तीन तोळ्याची चैन हिसकावून चारचाकी वाहनातून पोबारा झाल्याची घटना घडली आहे.