बातमी कट्टा:- खळ्यात खेळत असतांना 4 वर्षीय बालकाला सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील भटु शांतीलाल पाटील यांच्या येथे राजू पावरा हे सालदारकी म्हणून काम सांभाळतात.राजू पावरा हे कुटूंबांसोबत बाळदे येथील खळयाजवळ राहतात. आज सकाळी राजू पावरा यांचा 4 वर्षीय मुलगा संदिप राजू पावरा खळ्यात खेळत असतांना त्याला विषारी सापाने दंश केला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संदिपला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असता संदिपचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.