बातमी कट्टा:- लाख,कोटींमध्ये बोली लागणाऱ्या चेतक फेस्टिव्हलमध्ये यावेळेस कुठला घोडा करोडपती ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.यावर्षी तब्बल ६० एकर क्षेत्रात चेतक फेस्टिव्हलची तयारी झाली आहे.या यात्रोत्सवात ३ हजारहून अधिक अश्व दाखल होणार असल्याची माहिती चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली आहे.श्री दत्त जयंती निमित्त या यत्रोत्सवास सुरुवात होणार असून दि ८ डिसेंबर ते २ जानेवारी २०२३ पर्यंत चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी ६० एकर जागेवर जय्यत तयारी सुरू असून यंदा देशभरातून ३ हजाराहून अधिक अश्व सारंगखेडा येथे दाखल होणार आहेत. त्याचबरोबर अश्वसौंदर्य स्पर्धा,अश्व नृत्य स्पर्धेसाठी पन्नास लाख रुपयांपासून ते दहा कोटी रुपये पर्यंतचे अश्व दाखल होणार असल्याची माहिती चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली आहे.
स्पर्धेसाठी अश्वांच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे.तर यंदा चेतक एक्वाइन प्रीमियर लीग राबविण्यात येणार आहे.या चेतक फेस्टिव्हल मध्ये ५० हजारांपासून तर कोट्यवधी रुपयांपर्यंत घोड्यांची खरेदी- विक्री होत असते दरवर्षी 4 कोटी पेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होत असते.
अश्वांना उन्ह, वारा, लागू नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.भारतातील विविध प्रजातीचे घोडे दाखल होतात. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, महाराष्ट्रसह अनेक राज्यातील अश्वशो प्रेमी सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी व विक्रीसाठी येत असतात.


