सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-क परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी

बातमी कट्टा:- कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदांची, असे एकूण ६ हजार २०५ पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संवर्गाची लेखी परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ रोजी व गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.

▪️परीक्षा घेणाऱ्या न्यासा या कंपनीस सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल, व्हाटस-अप मोबाईल वर पाठवून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कंपनीव्दारे केल्या जाणारी बैठक व्यवस्था, केंद्राचे आरक्षण, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बैठक व्यवस्थेचे नियोजन, केंद्रामध्ये जॅमर बसविणे, प्रवेश पत्र निर्गमित करणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप आदी न्यासा कंपनीमार्फत केले जात आहे.

▪️सदरील भरती परिक्षा राज्यस्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी घेण्यात येत आहे.राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणुक अधिकारी ८ उपसंचालक मंडळे आहेत. नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा देण्यार असून तिन्ही जिल्हयातील एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ०८७, व्दितीय सत्रात १८हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

▪️या आरोग्य विभागाच्या भरती मध्ये पुणे ब्युरो कार्यालयातील १)केमीकल असिस्टंट २) सांख्यिकी सहाय्यक ३) औषध निर्माण अधिकारी ४) कनिष्ठ लिपीक या ४ संवर्गाची परिक्षा अहमदनगर जिल्हयात होत असून त्या पदांचे पुणे ब्युरो कार्यालय हेच नियुक्ती कार्यालय आहे.त्यामुळे त्या पदांकरिता अर्ज केलेल्या राज्यभरातील उमेदवारांना अहमदनगर जिल्हयात प्रवेश पत्र मिळालेली आहेत.

▪️उपसंचालक,आरोग्य सेवा ,नाशिक मंडळ ,नाशिक या कार्यालयात मे,न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने २ प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून अडमिड कार्ड व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी ९५१३३ १५५३५ , ७२९२०१३५५०, ९५१३५००२०३ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ.गांडाळ यांनी कळविले आहे. तसेच गट ड बाबतची परीक्षा ३१ऑक्टोबर २०२१ला होणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: