
बातमी कट्टा:- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या अवैध सावकारी प्रकरणातील संशयीत राजेंद्र बंब याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली होती.आज त्यांच्या योगेश्वरी पतपेढीतील लॉकरची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी केली आहे.

योगेश्वरी पतपेढी येथील राजेंद्र बंब यांचे 7 लाॅकर तपासण्यात आले असून त्यातील 2 कोटी 47 लाखांची रोकड, 210 सौदा पावत्या खरेदी खत,100 कोरे धनादेश, विदेशी चलन,6 लाख किंमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 34 काॅईन 2 कोटी पेक्षा अधिक किंमतीच्या 2400 एफ डी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.राजेंद्र बंब यांच्याकडे आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा अधिकची रोकड आणि सहा कोटींपेक्षा अधिकचे दागिने, यासह कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आले होते बँकेतील काही लाॅकरची तपासणी बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली होती, न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलिस कोठडी वाढवून दिल्यानंतर आज बंब यांच्या योगेश्वरी पतपेढी येथे लॉकर मध्ये आणखी मोठे घबाड सापडले आहे. ज्या लोकांची पिळवणूक बंबने केली आहे, असे पिडीत नागरिक आता स्वतःहून पुढे येत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करीत आहेत.