बातमी कट्टा:- अवैधरित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने पेट्रोलींग दरम्यान कारवाई करत क्रेटा कारसह 11 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कारवाई दरम्यान जंगलाजवळ कार सोडून चालक जंगलात फरार झाला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान अवैध धंदे व तसेच आंतरराज्य व आंतर जिल्हा अवैध दारु तष्करीवर कारवाई बाबत सुचना करण्यात आल्या होत्या.दि 9 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांंना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने 9 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आंतरराज्य सिमा भागात पेट्रोलींग करत असतांना नवापूर रोडवर जि.जे 27 बीएस 6487 क्रमांकाची क्रेटा कार संशयितरित्या जात असल्याचे समजले पोलीसांनी क्रेटा कारचा पाठलाग केला असता जगंलाजवळ चालकाने क्रेटा कार उभी करुन जंगलात पळून गेला.पोलीसांनी कारची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी कंपनीची दारु मिळुन आली.पिंपळनेर पोलीसांनी दारुसह 11 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोँईस निरीक्षक सचिन साळुंखे,भाईदास मालचे,लक्ष्मण गवळी,कांतिलाल अहिरे,प्रकाश सोनवणे, राकेश,संदिप पावरा,पंकज माळी,कैलास कोळी,विजयकुमार पाटील,रवींद्र सुर्यवंशी,पंकज वाघ,नरेंद्र परदेशी आदींनी कारवाई केली आहे.