बातमी कट्टा:- हाडाखेड सिमा तपासणी नाक्यावर जोगवा मागणाऱ्या तृतीयपंथींमध्ये हद्दी वरुन वाद झाला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्यप्रदेश राज्यातील तृतीयपंथ्यांनी एका हाडाखेड येथे तृतीयपंथीची केस उपटून मारहाण करत दागिने लुटल्याची घटना घडली आहे.
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड तपासणी नाका परिसरात हा राडा झाला आहे.शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तृतीयपंथी आरती रेश्मा जोगी वय 27 यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले की दि 12 रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर तृतीयपंथी आरती जोगी या जोगवा मागत असतांना मध्यप्रदेश (सेंधवा) येथील अन्नु नायक,गुड्डी,काली,गोरी,पुजा यांनी हद्दी वरुन वाद घालत पांढऱ्या रंगाच्या वाहनात तृतीयपंथी आरती यांना बसवून हॉटेल मध्ये घेऊन जात तेथे जोगवा मागू नये म्हणून शिवीगाळ करत मारहाण करत डोक्यावरील केस उपटून टाकले व माचिसच्या काडीने चटके दिले.अंगावरील सोनेचांदीच्या दागिन्यांसह 90 हजारांची रोकड लुटून नेली बाबत फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोसई नरेंद्र खैरणार करत आहेत.