बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे १६ फेब्रुवारी पासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला खान्देशातून मोठ्याप्रमाणात भावीक जात आहेत. या अपघात शिंदखेडा तालुक्यातील नणंद आणि भवजायीचा तर अमळनेर तालुक्यातील काल दिराणी आणि जेठाणीचा अपघातात व मालेगाव येथील एक महिलेचा चक्कर आल्याने असा पाच महिलांचा दोन दिवसात मृत्यू झाल्याचे समजले आहे.
मध्यप्रदेश येथील सिहोर येथे प्रदिप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेसाठी व रुद्राक्ष महोत्सवासाठी खान्देशासह महाराष्ट्र राज्यातून अलोट भावीकांची गर्दी जात आहे.काल दि १७ रोजी पहाटेच्या सुमारास सिहोर येथून घरी जाणाऱ्या भावीकांच्या इको वाहनाला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील देराणी जेठाणी या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांना धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
दि १७ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास रुद्राक्ष महोत्सव येथून अमळनेर पातोंडा येथे घरी परत येत असतांना सेंधवा जवळील जुलवानीया नजीक त्यांच्या ईको वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात कमलाबाई आत्माराम बिरारी वय ५५ व शोभाबाई लकडू बिरारी वय ५३ यांचा जागिच मृत्यू झाला तर मंगलाबाई भास्कर भदाणे,राजकोरबाई नरेंद्र पाटील,निर्मलाबाई विनायक बिरारी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धुळे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
दि १६ रोजी शिंदखेडा तालुक्यातील नदंण भवजायीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मिळालेल्या माहिती नुसार सिहोर येथे शिंदखेडा येथून जाणाऱ्या भावीकांनी प्रवासादरम्यान जेवणासाठी वाहन थांबवले होते.यावेळी जेवण आटोपून रस्ता ओलांडत असतांना भरधाव स्कार्पीओ वाहनाने मंगलाबाई अभिमन जाधव वय ४४ व सुनंदा रवींद्र मिस्तरी वय ४५ या चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मालेगाव येथील महिलेचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे समजले.काल दि १७ रोजी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भावीकांच्या इको वाहन अक्षरशः चक्काचूर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.