
बातमी कट्टा:- महाराष्ट्र राज्यात वाहतूक व विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या सुंगधीत तंबाखूजन्य पदार्थाची मध्यप्रदेश राज्यातून वाहतूक होत असतांंना शिरपूर शहर पोलीसांनी शिताफीने कारवाई करत 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथकाला कारवाई बाबत सुचना करण्यात आले.यावेळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलवे च्या पुढे पोलीसांनी सापळा रचला असता आर जे 32 जि सी 6075 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद येतांना धुळ्याच्या दिशेने येतांना दिसून आला.पोलीसांनी त्या कंटेनरला थांबवून ट्रकच्या मागील बाजुस तपासणी केली असता त्यात तांदूळ आणि इलेक्ट्रीक वस्तू आढळून आल्या.वस्तूंच्या मागील बाजूस तपासणी केली असता त्यात सुंगधीत तंबाखूचे बॉक्स गोणपाट मध्ये भरलेले आढळून आले.पोलीसांनी ट्रक चालक साजिद समश्या खान रा. धुरावली राज्य हरियाना दोघांंना ताब्यात घेत ट्रक वाहनासह 40 लाख 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर नहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर,शोध पथकाचे ललित पाटील,कैलास वाघ,रविंद्र अखडमल, विनोद अखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,प्रशांत पवार,भटु साळुंखे,सचिन वाघ,मनोज दाभाडे,मनोज महाजन, जितेंद्र मालचे,होमगार्ड गोपाल अहिरे,मिथुन पवार,राम भिल,चेतन भावसार व शरद पारधी आदींनी केली आहे.