सुट्टी संपल्यानंतर कर्तव्यावर जाणाऱ्या भारतीय जवानाचे निधन…

बातमी कट्टा:- लहानपणी वडील वारले होते.घराची अत्यंत गरीबीची परिस्थिती,आईने मोठ्या कष्टाने आपल्या एकुलत्या एक मुलाला मोठे केले.देशसेवेची स्वप्न बघत असतांना मोठ्यापणी जिद्द असल्याने भारतीय सैन्यात भरती झाले.काही वर्षापूर्वीच लग्न झाले होते.त्यांना सतरा महिन्याची एक लहान मुलगी होती.सर्व काही आनंदीत सुखी सुरु असतांनाच काळाने घाला घातला.15 दिवसांच्या सुटींसाठी गावी आले असतांना सुटी संपल्यानंतर कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले असतांना दिल्लीहून पुढे ट्रॉलाच्या धडकेत अपघातात त्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

धुळे तालुक्यातील सौदाणे येथील घनश्याम कपुरचंद बागुल वय 28 हे भारतीय सेनेत कार्यरत होते.पंधरा दिवसांच्या सुट्टीत ते घरी आले होते.सुट्टी पुर्ण झाल्यानंतर कर्तव्यावर जात असतांना दिल्लीच्या पुढे जाण्यासाठी भाड्याने केलेल्या चारचाकी वाहनात ईतर मित्रांसोबत जात असतांना दिल्लीच्या पुढे फिरोजपुरच्या जवळ त्यांची चारचाकी वाहन पंक्चर झाली होती.यावेळी उभ्या असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून भरधाव येणाऱ्या ट्रॉलाने जोरदार धडक दिली.यात धनश्याम बागुलसह आणखी एका जवानाचा मृत्यू झाला तर एक जवान गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

लहानपणी मयत धनश्याम बागुल यांचे वडील वारले होते. गरीब परिस्थितीत मोठ्या कष्टाने आईने घनश्याम बागुल यांना मोठे केले आणि घनश्याम बागुल हे भारतीय सेनेत भरती झाले.4 ते 5 वर्षापूर्वी घनश्याम बागुल यांचे लग्न झाले होते.त्यांना 17 महिन्याची मुलगी आहे.सर्व काही सुखी असतांना मात्र काळाने घाला घातला.

WhatsApp
Follow by Email
error: